Friday, June 7, 2019

That blissful moment


संध्याकाळची पांच ची वेळ. 
एकदम निवांतपणा ना मिटिंग्स  ना ऑफिस वर्क ना घरकाम 
ना मागे मुलाचा लकड़ा 
कसलीच घाई नाही






हलक्या वाऱ्यावर विंड चाइम नाजूक आवाज करात नाचत आहे 
हातात वाफाळत्या कॉफीचा मग घेऊन अलगद जो झुल्यावर बसाव 





कोफीच्या अरोमा बरोबरच अजून एक मंद सुवास सर्वदूर पसरला आहे  चाफ्याच्या फुलांचा 
एखादी नवी नवरी जशी नखशिखांत नटावी तसा चाफा फुलला आहे






पण खरा वेडावू न  टाकतोय तो गुलमोहर  पूर्ण बहरून आलेला 







बालकनीच्या कट्ट्यावर हनुवटी ठेऊन एकटक बघात होते

अचानक खाली पाहिल तर कट्यावर पण गुलमोहोराचे प्रतिबिंब
नीळ आकाश आणि बहरलेला लाल गुलमोहर 





त्या एका क्षणाला पूर्णपणे वर्तमानामधे मन 
पंचेन्द्रियाना मोहवणारा तो एक क्षण

That blissful moment..

1 comment:

Unknown said...

अप्रतिम. मी पण गुलमोहर वेडी आहे. To read your blog is becoming another blissful moment