नात्यांचा सर
आपल्या चिमुकल्या बाळाला मध्ये घेऊन आई वडील पहिला सर बांधायला सुरवात करतात !
मग आजी आजोबा काका काकू मावशी आत्या असे बाकीचे मोती अगदी अलगद येऊन माळले जातात आपोआप !
बहीण भाऊ .. सक्खे चुलत आते मामे भावंडं ह्या सगळ्या मोत्यांनी रक्ताच्या नात्यांनी पहिला सर बघता बघता भरतो !
हळुहळू दिवस जातात तस बाळ आपला नवीन सर बांधायला घेतो .. त्याचे मित्र मैत्रिणी .. शाळेतले ,बस मधले ,van मधले ,ग्राउंड वरचे ह्या क्लास चे त्या क्लास चे , शाळेतले शिक्षक ,कॉलेज चे मित्र ... मित्रपरिवाराची कुटुंब ... शेजारी पाजारी ... जेव्हढे मोती गुंफत जाल तेवढा सर वाढत जातो.
पहिला नात्यांचा सर आणि हा जोडलेल्या नात्याचा सर ..दोघातले मोती अधून मधून स्पर्श करत राहतात ..
क्षितिज रुंदावते तसे सर वाढत जातात.. नोकरीचे सहचारी .. नवीन नोकरी.. नवीन सहचारी.. नवीन सर
अशात कधी जीवनाचा सहचारी मिळतो आणि एका सोनेरी सरांची सुरुवात होते. त्या सराच्या बांधणीला मात्र आधीचे सर्व मोती एकत्र येतात. एकमेकांशी कधी स्पर्श झालेले नसले तरी त्या एका मोत्याच्या नवीन बांधणीला शुभेच्या द्यायला.
नवीन नात्यांचे नवीन मोत्यांचे नवे बंध .. त्यातून निर्माण झालेला नवा सर ...
मोत्याच्या ह्या माळेचे सौन्दर्य ज्यांनी मोती जोडलेत त्याला कळते ...
पण ह्या मोत्याच्या सरांची एक गोष्ट आपण विसरून जातो ह्याला गाठ नाही कुठल्याच बाजूला ..
मोती गुंफत जावे एका बाजूने आपल्या मर्जीने किंवा कळत नकळत .. पण कुठला मोती कधी निसटून जाईल ते आपल्या हातात नाही .. .बरं ह्याला first in first out असाही काही नियम नाही . वेळ आली कि अलगद बाजूला विरून जातो जितका अलगद आपण गुंफतो तितकाच ..सरामध्ये ती पोकळी राहते ती मग कायमचीच .त्याची जागा कुणीच घेत नाही ..आठवणींच्या मोत्याने ती जागा भरण्याचा प्रयत्न करतो जोडणारा मोती ..
आठवणींचे चे मोती आणि खरे मोती ह्याचा हा सर अदृश्य धाग्याने बांधलेला ..मोत्यांचा सर ..हेच तर आयुष्य !

1 comment:
Khup chhan mastach👌👌
Post a Comment