Aah you little bitter guard....Karela as we all know.
Not a karela fan but that young fruit was looking really likable.
Entire day karela was on mind.
कडू कारले तुपात भिजवले साखरेत लोळवले तरी कडू ते कडू।। काही काही म्हणी आठवत राहिल्या
कारल्याची भाजी।। मिठाच्या पाण्यात भिजवून कडूपणा काढून ती भाजी करायची किती तो अट्टाहास
ड्राय फ्रुट घालून पण एकदा कारल्याची भाजी करून पहिली होती माझंही मलाच हसू आल।। कुठे गेली ती रेसिपी शोधली पाहिजे मनात विचार डोकावला
आता गाडी घसरली ती
कारल्याचा वेळ लाव ग सुने।। लाव ग सुने।। ह्या भोंडल्याच्या गाण्यावर
किती वर्ष झाली असतील फेर धरून आता।।। शाळेत असताना प्रत्येकी च्या घरी भोंडला ला जाणे हे ठरलेलेच असायचे मग खिरापत ओळख।। दोघी तिघींचा मिळून भोंडला असेल तर मग खिरापतीची पण चंगळ असायची
एक दिवस शाळेत भोंडला असायचा।सगळी च्या सगळी गाणी पाठ होती।।। पण मग आता का नाही हे गाणं आठवते पूर्ण।। वेल लाव मग तो वाढव मग कारलं आलं कि त्याची भाजी कर मग खा मग मागचा आवर आणि मग जा माहेरी असं काहीसा होता ते। पण जॅम आठवेना त्याचे शब्द मग गुगल बाबा आहे कि मदतीला।
आता नवरात्री मध्ये गरब्याच्या सोंग वर नाचताना भोंडला कुठे हरवला का असा विचार निसटता आलं
कि जुनाट झाली हि सोंग आता।मलाच खटकतात आताच्या जनरेशन ला कशी आवडणार।। माझ्या आई वडिलांना भेटायला जायचा तर विचारायला कशाला हवा मनात आलं कि मी जाणार स्त्री स्वातंत्र्य का काय उफाऊं आलं मग बाकीची पण काही गाणी आठवली थोड्या फार फरकाने तशीच।। अगदीच outdated झ्हाली म्हणूनच मागे पडले हे मनात आले पण बहुदा ते तेवढेसे मनाला पटले नसावे कारण भोंडल्याचा विचार काही मनातून जात नव्हता
scene २
ऑफिस मध्ये असाच काही discussion चालू होत।नवरात्री चा विषय निघाला।। नवरात्री म्हणजे गरबा हे समीकरण झालाय जणू पण गरबा तर गुजराती लोकांचा मग महाराष्ट्राचा काय प्रश्न पुन्हा आलं तो भोंडला वर
जिथे मराठी वस्ती जास्त आहे अशा एरिया मध्ये ठाणे डोंबिवली आणि थोडे फार दादर विले पार्ले इथे सार्वजनिक भोंडला (backed बी सोने पोलिटिकल लीडर्स )च्या होअर्डींग्स काही ने पहिले होते।मग भोंडल्याची थोडी फार माहिती दिली intersting अशा विशेष टिपण्णी वर तो विषय संपला पण माझ्या मनातून काही गेला नाही ते मढी हत्ती ठेऊन त्या भोवती फेरा धरला जातो आणि नवरात्री मध्ये हस्त नक्षत्र असता म्हणून मध्ये हत्ती ठेऊन त्याची पूजा केली जाते असे असावे का? पुनः गुगल बाबाला पाचारण झाले आणि शेवटी समाधान झाले
बदलत्या काळात सगळीच समीकरण बदलली त्या ओघाने भोंडला मागे पडला हे वर करणी दिसले तरी खरंच तसे आहे का त्या काळी लहान वयात लग्न व्हायची एकत्र कुटुंब पद्धती होती आणि कुटुंब हि मोठी असायची सात आठमुलं असायची घरात।।। घरात सुना असणार तशाच घराच्या मुली हि कुणाच्या घरी सुना म्हणून असणार।। वय लहान तर मुलींना माहेरची ओढा साहजिक वाटणार मग असे मनात येईल तेव्हा माहेरी गेले तर तिकडे असणाऱ्या सुनेलाही तसे वाटणार।मग नणंद भावजय ह्यामध्ये तेढ येणार। आणि वय लहान असल्या मुले सासू चे परवानगी घेणे स्वाभाविक पणे आले त्यात त्या काळी बायका घरीच असायच्या शिक्षण नोकरी ची दालने तशी उघडली नव्हती मग घरात मोठ्या बाईचे थोडे अधिकार वाणी दाखवणे हि स्वाभाविक असेल कदाचित
आता हे सगळे कालबाह्य वाटले तरी मला एक मात्र अजूनही तितकेच खरे वाटते ते म्हणजे जबाबदारीची जाणीव।
भोंडल्याच्या गाण्यात कदाचित ती कडू कारल्याच्या च्या रूपकातून दाखवली असेल। वेल लाव त्याला पाणी घाल तो वाढव भाजी कर may be हे सगळे सांगते कि स्वतःच्या जबाबदारी नीट पार पाड।। सासू सांगते भाजी खा ते केवळ खाष्ट सासू म्हणून कडू कारल्याची भाजी खायला सांगते ह्याच्या पलीकडे जाऊन पहिला तर वाटत indicate करायचा आहे स्वतःची काळजी घ्या आणि शेवटी ती सासू पण कौतुकाने वेणी फणी करून तिला माहेरी पाठवतेच आहे कि। so शेवटी अर्थ आपण काढू तसा निघतो।
It all depends on how we perceive things.
On side note कारलं पुराण had an end when i finally had some home grown कारलं :)
References:
https://thereflectionssite.wordpress.com/2016/09/29/an-almost-forgotten-tradition/
https://www.speakmarathi.com/blog/2020/10/22/bhondla-a-fading-maharashtrian-tradition/
No comments:
Post a Comment