Sunday, March 31, 2024

देवपूजा

 Office ला जायचे आहे मला आज पूजा करणार का? अशी विचारणा झाली आणि नकळत तक धीमी तक धीमी  असे सूर बॅकग्राऊंड ला वाजत आहेत कि काय असा क्षणभर वाटलं.

आज सुट्टीचा दिवस Saturday त्यात संकष्टी चतुर्थी.गणपतीबाप्पा वर आपला विशेष जीव त्यामुळे फारच  खुशीत होती स्वारी 

तक धीमी तक धीमी च्या तालावर देवपूजा  झाली पण.

म्हणतात speed of  light  सगळ्यात जास्त असतो पण कधी कधी वाटतं विचाराचा स्पीड त्या पेक्षा जास्त असेल का?past present future तीन काळामध्ये ज्या वेगाने विचार येतात जातात ते पाहून तो बिचारा light हि दमेल

मन पोचले होते अगदी ४०-वर्ष मागे शाळेनंतर dance class ची वाट बघत असायचे मी ! नमस्कार  नटराजवंदना आणि मग पूजा असा तो sequence असायचा 

तक धीमी तक धीमी च्या तालावर फुलं गोळा करा

मग त्याचे हार बनवा गंध उगाळा मग देवाला गंध हार उदबत्ती दिवा घंटानाद आणि मनोभावे नमस्कार 

सगळे कसे तालबद्ध ! कोमल वयामध्ये ते देवभक्ती किती आपसूक होती

कधी नटराजवंदना कधी गणपती स्तुती कधी कृष्णा आराधना कधी रामस्तुती तो भक्तीरस नकळत भिनला तो कायमचाच। दहा वर्ष संपली पुढे वेगळी field निवडले गेले आणि डान्स मागे पडला पण देवपूजा करताना तक धीमी तक धीमी चे स्वर गुंजले नाही असा कधी झाला नाही 



Morning school office tiffin breakfast अशा super pack activities मध्ये देवपूजेचे department is with man of house आणि ती पण त्याने स्वतःहून घेतलेली (माझ्यापेक्षा तो जास्त भाविक आहे असे वाटते  मला कधीतरी )


Evening la घरी आले तर निरंजन उदबत्ती लावणे माझ्याकड। 

गुलबक्षी च्या झाडाला फुल आले असेल तर फारच छान








एकदम highlevel वर आस्तिक आणि नास्तिक असे दोन group मध्ये definitely मी  join होईन आस्तिक  गटाला

खूप जास्त भीती वाटली कि नकळत निघते ना तोंडातून राम राम  राम राम  

नाहीतर मारुतीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

भले मारुतीस्तोत्र मधले श्लोक इकडे तिकड़े होत असतील रामरक्षा पूर्ण पाठ नसेल पण तरी देवाशी नातं त्यामुळे  कमी होत नाही 

भाविकता हि  भावनाच किती relative आहे.

भाविक असणे म्हणजे काय? Definition लिहायला गेले तर भाव असणारा तो भाविक अशी साधी व्याख्या  करता येईल का?देवांमध्ये ज्याचा भाव आहे तो भाविक..मग हि भाविकता कशी व्यक्त होते हा ज्याचा त्याच्या  खूप  खासगी प्रश्न नाही का ?

कुणी रोज देवपूजा करेल , स्तोत्र म्हणेल देवळात जाईल घरात धूप पूजाअर्चा करेल,उपासतापास  करेल , नैवैद्य दाखवेल ..आणि  जो  सगळे  हे  जास्त  करेल  तो  जास्त  भाविक  असे  सरळ  समीकरण बांधू  शकतो आपण ?

करावेसे वाटते पण  वेळच  मिळत  नाही  असेही  कितीदा ऐकतोच कि…24 hrs a day सगळ्यांना वेळ तर  सारखाच असतो मग हा priority चा भाग आहे का?

आणि priorities तर माणसागणिक वेळेप्रमाणे परिस्तिथिनुसार सतत बदलत राहतात ..

Exams आहेत job interview आहे, शुभकार्य आहे, काहीचं मार्ग सुचत नाही..आपल्या हातात काहीचं नाही  असे वाटते तेव्हा नकळत देवासमोर नतमस्तक होतोच कि..मग ह्या देवाला आपला रोज पार्टनर केले तर better नाही का 


तो रोजच तुमच्या बरोबर आहे 

कधी kitchen मध्ये कधी ऑफिस मध्ये कधी walk करताना 

तक धीमी तक धीमी च्या तालावर आयुष्यात लय आणायला !


No comments: