यम
भलत्या वेळी दरवाजावर थाप पडली .. तिने धावत येवून दरवाजा उघडला बाहेर पाहते तो दारात यम उभा दिसला .. त्याला पाहून ती गोड हसते ... असा अचानक मध्येच कसा आलास .. असे यमालाच विचारते तो म्हणतो मी तुला न्यायला आलोय चाल लवकर आवर ..... ती म्हणते ... हो जावू आपण पण जरा आत ये बघ तर माझे घर आता थोड्याच वेळात बाळाचे बाबा येतील आले कि कुठे आहेस ग तू म्हणत घरभर फिरतील ... त्यांचे मुळी माझ्याशिवाय पान हलत नाही त्यांचेच काय सारे घरच माझ्याशिवाय अजिबात चालत नाही .... तिथे पलीकडे बघ ... तिथे ...